Showing posts with label बातम्या. Show all posts
Showing posts with label बातम्या. Show all posts

असा असेल मराठा आरक्षण मोर्चाचा मार्ग अंतरवाली ते मुंबई आझाद मैदान ...

 मराठा आरक्षण मोर्चा :

मराठा आरक्षण मोर्चा अंतरवाली ते मुंबई

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज रंगे पाटील मुंबईच्या आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहेत. अंतरवाली ते मुंबई या पायी दिंडीचा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी 2024 रोजी पायी दिंडी निघणार आहे. त्याचा मार्ग खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.

    अंतरवाली - जालना - बीड - अहमदनगर - पुणे - रायगड आणि मुंबई - आझाद मैदान.

या जिल्ह्यातून आंदोलन आझाद मैदान वर धडकणार आहेत. हा भगवा अलर्ट सागर मराठ्यांचा संपूर्णपणे हा मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार आहे. हा लढा शेवटचा असून मराठा समाज घराबाहेर पडून मुंबईकडे पूछ करावी. असे आवाहन मराठा नेते तरंगे पाटील यांनी केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी अंतरवाली येथे प्रसार माध्यमांची बोलताना मुंबईतील नियोजित आंदोलनाचा आराखडा जाहीर केला. अंतर्वली ते मुंबई हा मार्ग पायी घाटायचा असून मुक्कामाची व्यवस्था स्वतः आंदोलकांनी करायचे आहे. असे जरांगे पाटील यांनी सांगितले असून, त्यानुसार 20 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली जिल्हा जालना येथील सकाळी नऊ वाजता जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी निघणार असून, अंतरवाली- शहागड -गेवराई -पाडळसिंगी -मादळमोही- मातोरी -खरवंडी पाथर्डी -तिसगाव -करंजी- अहमदनगर -सुपा- शिरूर घोड नदी -शिक्रापूर- वाघोली -चंदन नगर- पुणे- लोणावळा- नवी मुंबई चेंबूर मार्गे आंदोलन आझाद मैदानावर पोचणार आहे. अंतरवाली येथून निघालेल्या आंदोलन दिंडीत गावोगावचे लोक सहभागी होणार आहेत. मुंबईपर्यंत ही दिंडी व्यापक स्वरूप धारण करणार आहे. असे मराठा नेते मनोज तरंगे पाटील यांनी म्हटले आहे. सहभागी आंदोलकांसोबत वाहन असणार आहे. जेवणासाठी आवश्यक साहित्य आणि दैनंदिन वापराचे सामान सोबत घेण्याचे आवाहन तरंगे यांनी केले आहे. या सामानाची यादी नंतर जाहीर केली जाणार आहे. ही दिंडी शांततापूर्ण असून प्रत्येक वाहनात दोन समन्वयक असतील आंदोलकांनी नेमून दिलेल्या गटात राहणे बंधनकारक आहे. योग्य पद्धतीने दिंडी मुंबईत दाखल होईल रस्त्याने राज्यातील वेगवेगळ्या भागातील आंदोलन दिंडीत सहभागी होती. असे ते म्हणाले तुकडीत आराम कोण करणार पहारा देण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यादरम्यान आंदोलकांची दिंडी ज्या गावातून जाणार आहे. त्या गावातील लोक मुंबईला जाणाऱ्या लोकांची जेवण व रानाची व्यवस्था करणार आहे. गावकऱ्यांनी एकत्रितपणे मदत करावी असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.


🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा कोट  मराठा 🚩🚩🚩🚩

3 हेक्टर पर्यंत मदत जाहीर। येत्या अधिवेशनात घोषणा करण्यात येणार ...

 अवकाळी पाऊस आणि गारपीट :

Avkali paus

वार्ता : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र आधी सर्व जिल्ह्यांचे पंचनामे एकत्रित प्रस्ताव सादर झाल्यानंतरच मदत दिली जाणार आहे. मात्र प्रत्यक्ष मदतीची घोषणा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल. यासाठी महसूल कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रीतीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाला बैठकीत दिले.

नुकसानीचे पंचनामे तयार होण्यासाठी चार-पाच दिवस लागतील. त्यानंतरच नुकसानीची नेमकी आकडेवारी समोर येईल त्यानंतर मदतीचे सूत्र निश्चित केले जाईल. हे लक्षात घेता हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा शक्यता आहे.


तातडीने प्रस्ताव सरकारकडे पाठवा :

                      पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणा द्यावेत व ते 30 टक्के पेक्षा जास्त पिकांच्या नुकसानीची भरपाईचा प्रस्ताव रोजगार शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले.

मराठवाड्यात 60 हजार हेक्टर वर नुकसान :

           मराठवाड्यात 600158 हेक्टर वरील रब्बी हंगामातील पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे तर रविवार पासून बुधवार पहाटेपर्यंत 61.7 मिलिमीटर पाऊस विभागात झाला आहे बुधवारी सकाळपर्यंत विभागात 13 मि मी  पावसाची नोंद झाली.



महाराष्ट्रातील 1.43 कोटी शेतकर्यांनी भरला एक रूपयात पिक विमा... pmfby-2023...

 पिक विमा -2023 :

आज आहे शेवटचा दिवस 

pmfby-2023

  महाराष्ट्र : राज्य शासनाकडून पुढील तीन वर्षासाठी पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरता येतो. त्यानुसार राज्यात आतापर्यंत एक कोटी 43 लाख 27 हजार 515 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. 2022 च्या खरीप हंगामात 96 लाख 62 हजार 261 शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यंदा 43 लाख 65 हजार 254 शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.             

                  सर्वसमावेशक प्रधान मंत्री पीक विमा योजना राबविण्यात येण्याचा निर्णय 23 जून पासून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम राज्य शासनाकडून भरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रूपात पिक विमा भरता येत आहे. शिवाय विमा भरणाऱ्या सामायिक सेवा केंद्रांना ही कंपनी प्रति लाभार्थी चाळीस रुपये देते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया खर्च आला आहे.

              दरम्यान एक रुपयात पीक विमा करता येत असल्याने शेतकऱ्याने अर्ज केले आहेत. परिणामी विमा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दुप्पट वाढली आहे. राज्याच्या 81 हजार 182 कर्जदार शेतकरी आहेत. त्यांना विमा काढणे बंधनकारक आहे. तर एक कोटी 68 लाख 46 हजार 333 शेतकरी बिगर कर्जदार असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ही पिकांचा विमा उतरवलेला आहे.


मुलांना व मुलींना मोफत पोलिस भरती प्रशिक्षण - 2023...असा करा अर्ज... mahajyoti...

 Mahajyoti purv prashikshan-2023 :

Mahajyoti

पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 महाज्योती मोबाईल मधून फॉर्म भरा | Police Bharti Pariksha Purv Prashikshan Mahajyoti 2023 Last Date Eligibility Qualification Online Application Form.




Police Bharti Pariksha Purv Prashikshan Mahajyoti 2023 - फ्री पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर संस्थेकडून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण करिता. ओबीसी/विजेएनटी/ एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून. ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. तर या पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना 27 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने महाजोतीच्या वेबसाईट वरती जाऊन अचूक पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण महाजोती ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, तसेच विशेष मागास प्रवर्गातील 12 वी फास्ट असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. तर या योजनेचे स्वरूप, योजनेच्या लाभासाठी पात्रता, शारीरिक क्षमता, अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे, अर्ज कसा करावा, सामाजिक प्रवर्गनिहाय विभागणी (Category Wise Reservation) प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. 

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेचे स्वरूप (mahajyoti police bharti training 2023)

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना महाजोती संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

प्रशिक्षणाचा कालावधी - 4 महिने करिता

विद्यावेतन - ₹6000 रु प्रति उमेदवार (ऑफलाइन प्रशिक्षणाकरिता)

प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या - नागपूर साठी - 300 ते छत्रपती संभाजीनगर साठी - 300 एकूण 600 उमेदवार
शिक्षण पात्रता (Education/ Qualification) - 12 वी पास

योजनेच्या लाभासाठी पात्रता (Eligibility) - 

1) विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी

2) विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती - भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी

3) विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी

4) विद्यार्थी हा बारावी पास असावा किंवा असावी

5) मुलं किंवा मुली दोघेही अर्ज करू शकतात.

शारीरिक क्षमता (Physical Ability)

विद्यार्थी प्रशिक्षणा करिता पात्र झाल्यास खालील बाबींची पूर्तता करण्यात यावी अन्यथा योजनेचा लाभ घेता येणार नाही.

उंची (पुरुष) - कमीत कमी 165 से.मी. 

उंची (महिला) - कमीत कमी 155 से.मी. 

छाती - कमीत कमी 79 से.मी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 84 सेमी) केवळ पुरुषांकरिता.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड

2) रहिवासी दाखला

3) जातीचा प्रमाणपत्र

4) वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र

5) 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

6) बँकेचा तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक)

अर्ज कसा करावा (Online Application Form Fillup Process)

1) अर्ज करण्यासाठी महाजोतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईट वरती जाऊन Notice Board या पर्यावर क्लिक करून पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

2) अर्जासोबत वरती देण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रे Self Attested करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून मग अपलोड करावे.


या तारखेला होणार खात्यात जमा नुकसानभरपाई.... Nuksan bharpai jama honar...

नुकसान भरपाई :

नुकसानभरपाई
New Marathi Corner 


कृषी विषयी :

                 नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक खास महत्त्वाची माहिती मित्रांनो सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे भरपूर प्रमाणात महाराष्ट्रामध्ये हाती आलेल्या पिकांचे फळबागांचे खूप प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे.

       या झालेल्या सर्व पिकांचे फळबागांचे पंचनामे करून लगेच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सांगितले. यामध्ये झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे पिकांचे फळबागांचे पंचनामे येत्या चार दिवसांमध्ये करण्यात येतील आणि पुढील दहा दिवसात प्रत्येक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे.

       

आता १ एप्रिल पासून तुमचे वाहन जाऊ शकते भंगारात ... करा हे काम लवकर... Vehicle scrap ruls regulation 2023 ...

तुमचे वाहन जाऊ शकते भंगारात :

Vehical scrap
New Marathi Corner 

 वार्ता  : एक एप्रिल 2023 पासून पंधरा वर्षे जुने असलेले सरकारी वाहन गंगाराम काढण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन पोर्टल तयार केले आहे, पण शासन निर्णयानुसार जे खाजगी वाहन आहेत जे खाजगी वाहनधारकांना त्यासाठी काही अटी व शर्ती ठेवले आहे.

            त्याप्रमाणे जे खाजगी वाहनधारक आहेत त्यांना योग्यता प्रमाणपत्र शुल्क भरून आणि फिटनेस टेस्ट करून त्यांची वाहने वापरता येणार आहे .

           शासन निर्णयानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी पंधरा वर्षाहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. पण खाजगी वाहनधारकांना पर्यावरण कराची मुदत गाडीचे आयुर्मान संपल्यापासून पुढे पाच वर्षे आणि पासिंग शुल्काची मुदत पासिंग केलेल्या दिनांकापासून पुढे पाच वर्षे असणार आहे.

              दरम्यान या जुन्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र शुल्कात मोठी वाढ केली आहे त्यामुळे जुने वाहन वापरणे महागात पडणार आहे वाहनधारकांना.

      वाहन फिटनेस दर पत्रक :

 

वाहनाचा प्रकार        सध्याचे दर       नवे दर

  टृक                        ३००               १३०००

  टेम्पो                      ६००                ७५००

  रिक्षा                      ६००                 ३५००

 चारचाकी                 ६००                ६०५०

 दुचाकी                    ३००                १९५०

      

या औषधांच्या किंमती वाढणार ?... पहा किती टक्के वाढणार किंमती.. medicine price wadnar...

 औषधी महागणार  :

Medicine price
औषधी महागणार 
  
  वार्ता : हृदयविकार व मधुमेह अनेक आजारावरील औषधांच्या किमती येत्या एक एप्रिल पासून 12 टक्के वाढण्याची शक्यता आहे ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ ठरणार आहे.
           एक हजार फॉर्म्युलाशनच्या 384 औषधांच्या किमती 12.2% वाढवण्याची परवानगी देण्याचा विचार सरकार करीत आहे खाऊ किमती निर्देशकांच्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
           राष्ट्रीय औषधी किंमत प्राथमिकरणाच्या सहयोग आयुक्त रश्मी टहलियानी यांनी सांगितले की 2021 च्या तुलनेत 2012 मध्ये खाऊ किंमत निर्देशक 12.12 टक्के वाढवला आहे त्यामुळे सत्तावीस आजारावरील 900 पेक्षा अधिक फॉर्म्युलाशन वापर योग्य औषधी किमत 12 टक्के वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली या निर्णयामुळे माघ होणाऱ्या औषधात विविध प्रकारचे विविधनाशामक औषधी संसर्ग रोधक के प्रति जैविके अँटिबायोटिक्स यासहृदयविकार व मधुमेहावरील औषधांचा समावेश होणार आहे .
       

     

दुःखद वार्ता ... भाजपा खासदार मा. गिरिष बापट यांचे निधन...khasdar girish bapat yanche nidhan

पुणे  भाजपा खासदार गिरिष बापट यांचे निधन :

भाजपा ज्येष्ठ खा. गिरिष बापट यांचे निधन
New Marathi Corner

दुःखद वार्ता : पुणे भाजपा ज्येष्ट खासदार गिरिष बापट यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले .

कारकिर्दी : टेल्को कंपनीत नोकरी ते खासदार होण्यापर्यंत चा प्रवास ।

 जन्म : ३ सप्टेंबर १९५०

 मृत्यू :  २९ मार्च २०२३

 राजकीय कारकीर्द : 

                          - पुण्यात टेल्को कंपनीत कामगार नेते .

                          -पहिल्यांदा १९८३ मधे पुणे                                                महापालिकेमधे नगरसेवक म्हणून                                      निवडून आले. 

                         - ते पण सलग तीन वेळस नगरसेवक                                   म्हणून निवडून आले .

                         - पहिल्यांदा १९९५ मधे आमदार म्हणून                               निवडून आले. ते पण सलग पाच वेळेस                              ते आमदार राहिले. 

                        - २०१९ ला ते पुण्यात खासदार म्हणून                                 निवडून आले. 


          न्यु मराठी कॉर्नर कडून ज्येष्ठ खासदार मा. गिरिष बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐


                        आणखी वाचा

 


आता करा या तारखेपर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक अन्यथा आपले आधार कार्ड होईल बंद... adhar pan card link

 आधार कार्ड आणि पॅन कार्ड होईल बंद :

आधार पॅन लिंक करणे
आधार पॅन 

  नमस्कार आज आम्ही घेऊन आलो आहोत एक खास माहीती ती तुमच्या साठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण जर तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर ते बंद होऊ शकते तर चला पाहु काय ते.. 

 नवी दिल्ली: सरकारने काही वर्षांपूर्वी आधार आणि पॅन लिंक करण्याची सूचना केली होती 30 जून 2022 ही शेवटची तारीख होती विना मूल्य त्यानंतर आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 30 जून 2022 नंतर यासाठी एक हजार रुपये विलंब शुल्क आकारण्यात येणार होते.

                            न्यू मराठी कॉर्नर

  आता 31 मार्च 2023 ही आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत असून आधार व पॅन कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल तसे झाल्यास आपण लोकांना म्युच्युअल फंड किंवा डिमॅट अकाउंट खाते उघडता येणार नाही याशिवाय कोणतेही कागदपत्र म्हणून त्यांचा वापर केल्यास दहा हजार रुपयांचा दंड ही बसू शकतो.

सरारने ३१ मार्च २०२३ ही शेवटची तारीख दिली होती आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी पृंतु आता ती तारीख वाढवली आहे तरी ज्यांचे अजून पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले गेले नसेल तर ते लिंक करुन घ्याने 

       आधार कार्ड लिंक करण्यासाठी येथे click करा 

आमचा लेख आवडल्यास शेअर करा। 

धन्यवाद। 

खुशखबर ! ...येत्या २४ तासात या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे ...Pikvima vatap suru 2023...

 पिक विमा भरलेल्या सर्व शेतकरीवर्गासाठी खुशखबर:

पिक विमा २०२३
पिकविमा - २०२२
खुशखबर !...येत्या २४ तासत या शेतकर्‍यांच्या खात्यात पीकविमा पैसे होणार जमा... 
नमस्कार शेतकरी बंधुनो आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या साठी एक अशी खुशखबर हो कारण शासण निर्णय नुकताच आला आहे. त्या निर्णयानुसार येत्या २४ तासा मधे पिक विम्याचे पैसे खात्यात जमा होणार आहेत. 
    शासण निर्णय पाहण्यासाठी येथे click  करा 

चालू अर्थसंकल्पिय अधिवेशनात घोषणा करण्यात आली आहे की ३१ मार्च पर्यंत सर्व शेतकरी वर्गाचे पिकविम्याचे पैसै खात्यात जमा केले जातील. 

मोठी बातमी...ईस्रो ची गगनभरारी उडान... ishro chi gaganbharari udan...

 सर्वात जास्त वजन असलेल्या राॅकेटने नेले ब्रिटनचे ३६ उपग्रह नेले अंतराळात 

ISRO LMV -3
ISRO LMV -3 

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( ईस्रो )
रविवारी एकावेळीस ब्रिटनचे 58.5 किलो वजनाचे 36 उपग्रह प्रक्षेपित केले गेले.व आपले या क्षेत्रातील वर्चस्व प्रस्थापित केले. 
 LMV 3 Oneweb India - 2 :
                           या मोहिमेला एल व्ही एम - ३ /  वनवेब इंडिया -२ असे नाव दिले.  सतीश धवन अंतराळ श्रीहरीकोट्टा केंद्राच्या स्पेससपोर्टवरून सकाळी ९:०० ला उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. 
       या मोहिमेत ईस्रोचे 43.5 मीटर लांबीचे LMV -3 राॅकेट वापरले. हे सर्वात वजनदार राॅकेट आहे. 
काय फायदा  ?
  - प्रक्षेपणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात अंतराळ आधारित ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवण्याचे योजनेत मदत होईल.
  - कंपनीने म्हटले आहे की वनवेब हे केवळ भारतातील उद्योगांनाच नव्हे तर शहरे ,गावे ,महानगरपालिका आणि शाळा नाही सुरक्षित कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
भागीदारी कोणाकोणाची :
              - India =Bharti Enterprises 
              - France=Utelsat
              - Japan = Softback
              - America = Hujes Networks 
              -South Korea = Defence Company Hanva. 
             
               "ईस्रो" चे सर्वत्र कौतुक 🇮🇳🇮🇳


अवकाळी पावसाचा तडाखा... सव्वादोन लाख शेतकऱ्यांचा भरपाई साठी अर्ज ...avkali pausacha tadakha

 अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊस 

अवकाळी पाऊस : राज्यात गेल्या पंधरवड्यात दोनदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आह.

याच नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्याकडे अर्ज केला आहे .

राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोन वेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले कान्हेरला आलेल्या पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातून राशी आलेला घास हिरावला अनेक जिल्ह्यांमध्ये गहू हरभरा काढलेला आला होता तर काही शेतकऱ्यांच्या काढणीला केलेल्या पिकावर पावसाचे पाणी पेरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे काढणीला आलेले द्राक्ष,आंबा ,केळी, मोसंबी या फळ पिकांचा जमिनीवर सडा पडला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो नुकसान झालेले आहेत.

किती अर्ज दाखल केले : राज्यातून 1 लाख 60 हजार 809 अर्ज विमा कंपन्या कडे आले आह नुकसान भर पैसा अर्ज आल्यानंतर त्याचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येते त्यानुसार आत्तापर्यंत एक लाख 5241 अर्जांचे सर्वेक्षण झाले आहे तर 55,568 अर्जंट सर्वेक्षण झालेले नाही.


बीडसांगवी ग्रामपंचायत मधे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन पाळला गेला...Chatrapati Shambhaji Maharaj Balidan Din...

 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन :


छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन
आष्टी: 

वयाच्या नवव्या वर्षी स्वराज्यरक्षणासाठी मैदानात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास.

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन - ११ मार्च १६८९.

महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या विनम्र स्मृतीस मानाचा मुजरा.

  बीडसांगवी ग्रामपंचायत मधे संपूर्ण आठवडा बलिदान मास पाळला गेला . आणि २१ मार्च दिवशी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन पाळला गेला. या वेळी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला फुल गुच्छांचा हार अर्पण करुन सर्व मावळे नतमस्तक झाले. या वेळी उपस्थित सरपंच नंदकिशोर दादा करांडे, उपसरपंच, सदस्य, नेते संपत ढोबळे, अनिल आगवान, बाबासाहेब करांडे, सुनील आगवान, आकास पानतावणे, दादा साळवे, राहुल पानतावणे, व सर्व गावकरी व मावळे उपस्थित होते

      

                           न्यु मराठी कॉर्नर 

करा हे काम अन्यथा तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते... kara he kam nahitr adharcard hou sakte band...

 आधार कार्ड अपडेट :

Adhar Card update
आधार कार्ड अपडेट

अपडेट: नमस्कार सर्व नागरिकांना एक खुप महत्वाचे अपडेट माहिती आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक नवीन नोटीस जारी केली आहे. त्यानुसार जर ज्या कोणी नागरिकांचे आधार कार्ड ला १० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्या नागरिकांनी आपले आधार कार्ड update करून घ्यावे। 

         आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करण्यात आले असून, प्रत्येक नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे। 

आधार कार्ड अपडेट करण्याकरती आपण आधार कार्ड सेंटर वर किंवा घरी आपल्या मोबाईल वर सुद्धा करू शकता जर आपला मोबाइल नंबर जर आधार कार्ड ला लिंक असेल तर घरी पण अपडेट करू शकता। 

आधार कार्ड अपडेट करण्यची शेवट तारिख ही १४ जून  २०२३ आहे त्यानंतर आपल्याला विलंब शुल्क आकारले जाईल। 

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ५० शुल्क आकारण्यात येणार आहे. 

                         न्यु मराठी कॉर्नर 

आधार कार्ड लिंक करण्यासाठी येथे click करा 

साडे तीन क्विंटल कांदा विकला... हातात आले ते फक्त विना पैश्याची पट्टी... sade tin kinwtal kanda vikun hatat kahich ale nhi

 कांद्याला मिळाला कवडी मोल भाव:तिकीटाला ही उरले नाही पैसै। 

कांदा भाव
कांद्याने रडवले

बीड: बाजारात भाव पडल्याने कांद्याने उत्पादक शेतकरी आणि कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणले आहे साडेतीन टन कांदा विक्री करू नये पदरात काहीच पडले नाही उलट अडत व्यापाऱ्याला 1800 रुपये देण्याची वेळ बीड तालुक्यातील जयतालवाडी येथील भागवत सोपान डांगे या शेतकरी कुटुंबावर आली.

      70 हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने हातात झालेल्या शेतकऱ्याने आम्ही जगायचे कसे मुलाचे शिक्षण करायचे कसे असा प्रश्न व्यवस्थेला केला आहे.

        जैताळवाडी येथील भागवत डांगे यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली महागाचे बियाणे लागवडीचा खर्च खुरपणी फवारणी खते आणि कापणीचा खर्च असा 70 हजार रुपये खर्च केला १२० गुन्ह्यात भरून कांदा सोलापूरच्या बाजारात पाठवला कांदा विक्री केल्यानंतर हाती पडलेली पट्टी पाहून आणि आणखी 832 रुपये जमा करण्याचे अडत्या अडत्याने सांगितल्याने भागवत डांगे व मुलाला धक्काच बसला गावाकडून पैसे मागून घेतले तिकिटासाठी शंभर रुपये देखील उरले नव्हते रिकाम हाताने आलेल्या भागवत रावांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कुटुंबई रात्रभर रडले जगायचे तसे असा प्रश्न या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या कुटुंबाने केला.

असा आहे हिशोब :

             कांद्याला मिळाला 50 रुपये क्विंटल भाव

1) भागवत डांगे यांना पंधराशे 50 किलो कांद्याचे 775 रुपये आले बाजारात हमाली तोला यांनी तर खर्च 288 रुपये झाला त्यांना मायनस पट्टी मिळाली मिळाली शेतकऱ्याला पदरशेत 1383 रुपये द्यावे लागले.

           कांद्याला मिळाला शंभर रुपये क्विंटल भाव

2) डांगे यांनी 2011 किलो कांदा विकला असता शंभर रुपये क्विंटल भाव मिळाला फक्त 2135.20 रुपये पट्टी आली त्या कडील हमाली तो लय आणि इतर खर्च 2583.89 आला 448.69 रुपये शेतकऱ्याला पदरचे भरावे लागले.

     हातात काहीच आले नाही:

       कांदा चांगला निघाल्याने किमान दीड लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती यातून मुलाचे शिक्षण लग्न घर प्रपंच चालवता येईल असे वाटले होते पण काहीच हाती लागले नाही. 

                             : भागवत डांगे, 

                                    शेतकरी जैताळवाडी. 

मोठी बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे. OPS scheme Maharashtra मोठी बातमी ! अखेर शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे. OPS scheme Maharashtra

Old pension scheme
Old pension scheme 


मोठी बातमी ! अखेर शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे.

OPS scheme Maharashtra 

या बैठकीत जुनी पेन्शन योजनेच्या मागणीबाबत तोडगा काढण्यात आला असून हा संप मागे घेण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं. तसेच या संपादरम्यान सरकारी कार्यालयातील कामकाजही ठप्प झालं होतं.जुनी पेन्शन योजना 

संपादरम्यान काही सरकारी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आणि काळे शर्ट घालून आंदोलन केलं. तसेच सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत योग्य निर्णय न घेतल्यास या संपाची धार यापुढेही तीव्र करण्यात येण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आता हा संप मागे घेण्यात आला आहे.

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संप पुकारला होता. 

गेल्या ७ दिवसापासून सुरू असलेला संपात मात्र, आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली.

                                जुनी पेन्शन योजना 

पॅन आधार लिंक करण्याचे अखेरची संधी गमावू नका ....pan adhar link karnyachi shevtachi sandhi

 

पॅन आधार लिंक करण्याची अखेरची संधी
आधार पॅन लिंक

नवी दिल्ली: सरकारने काही वर्षांपूर्वी आधार आणि पॅन लिंक करण्याची सूचना केली होती 30 जून 2022 ही शेवटची तारीख होती विना मूल्य त्यानंतर आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 30 जून 2022 नंतर यासाठी एक हजार रुपये विलंब शुल्क आकारण्यात येणार होते.

                            न्यू मराठी कॉर्नर

  आता 31 मार्च 2023 ही आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत असून आधार व पॅन कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल तसे झाल्यास आपण लोकांना म्युच्युअल फंड किंवा डिमॅट अकाउंट खाते उघडता येणार नाही याशिवाय कोणतेही कागदपत्र म्हणून त्यांचा वापर केल्यास दहा हजार रुपयांचा दंड ही बसू शकतो.

                              न्यू मराठी कॉर्नर

सोन्याचा भाव 65 हजार रुपये वर जाणार ?...Sonayacha bhav 65 hajaravr janar

 

गोल्ड प्राइस
सोन्याच्या किंमती

नवी दिल्ली: अमेरिका युरोप मधील बँकिंग संकट आणि शेअर बाजारातील उलथापालक यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहे त्यामुळे जागतिक बाजाराबरोबरच एमसीएक्स आणि देशांतर्गत सराफ बाजारात सोन्याची चमक आणखी वाढली आहे गेल्या आठवड्याभरात तर सोन्याच्या भावात 2500 रुपयांची वाढ झाली आहे चांदी देखील आठवडेभरात 5200 रुपयांनी उदाहरण ती 67 हजार पाचशे रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे सोन्याच्या भावात पुढील दिवसात मोठी वाढ होत ते 65 हजारापर्यंत मोजण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

      चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ

     

गेल्या महिन्यात 56 ते 57 हजार रुपये दरम्यान असलेले सोन्याचे भाव शुक्रवारी जळगाव मध्ये ५८५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत चांदी देखील आठवड्याभरात 5200 रुपयांनी व धारून ती 67 हजार पाचशे रुपये प्रतिकूल वर पोहोचली आहे.

             का आवडले भाव ?

 बाजारात सुरू असलेल्या असते त्यामुळे सुनेला मागणी वाढत आहे यामुळे या वर्षाखाली सोन्याचा दर 65 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत जाऊ शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे.

कांद्याला आता 350 रुपये अनुदान....kanda anudan ata 350 rupaye

 

कांदा अनुदान 350 रुपये
कांदा अनुदान

    मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता या अनुदानात वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली होती त्यानुसार आता हे अनुदान प्रतिक्विंटल 350 रुपये करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.

          नाशिकहून मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी बरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली राज्य सरकार मागण्या बाबत सकारात्मक असून शेतकऱ्यांना आंदोलन माग घ्यावी अशी आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल.

के एल राहुल ने साकारला भारताचा विजय.....K L Rahul ne sakarla Bhartacha vijay

 

के एल राहुल ने साकारला भारताचा विजय
 

मुंबई : गेल्या काही सामन्यात सातत्याने अपयश ठरल्यानंतर टीका करांचा टारगेट ठरलेल्या लोकेश राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एक दिवशी सामन्यात खंबीर फलंदाजी करत भारताला पाच गड्यांनी विजय मिळवून दिला.

       राहुलने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शांतपणे खेळताना 91 चेंडू सात चौकार व एक षटकार सह नाबाद 75 धावांची विजयी खेळी केली राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी केलेले शतकी भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरले.

       नाणेफेक जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाला 35.4 षटकात 188 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने 39.5 षटकांमध्ये पाच फलंदाजाच्या मोबदल्यात विजय मिळवला लक्षाचा पाठलाग करताना भारताचे पहिले चार प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. यामुळे यजमानांचे चार बाद 39 अशी अवस्था झाली होती. मात्र राहुलने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत भारताला मालिकेत एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली कर्णधार हार्दिक पांड्या 25 आणि रवींद्र जडेजा 45 यांनी दमदार फलंदाजी केली या सहभारताने वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एक दिवसीय सामन्यातून केवळ दुसरा विजय मिळवण्याची कामगिरीही केली.