मुलांना व मुलींना मोफत पोलिस भरती प्रशिक्षण - 2023...असा करा अर्ज... mahajyoti...

 Mahajyoti purv prashikshan-2023 :

Mahajyoti

पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 महाज्योती मोबाईल मधून फॉर्म भरा | Police Bharti Pariksha Purv Prashikshan Mahajyoti 2023 Last Date Eligibility Qualification Online Application Form.




Police Bharti Pariksha Purv Prashikshan Mahajyoti 2023 - फ्री पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर संस्थेकडून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण करिता. ओबीसी/विजेएनटी/ एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून. ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. तर या पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना 27 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने महाजोतीच्या वेबसाईट वरती जाऊन अचूक पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण महाजोती ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, तसेच विशेष मागास प्रवर्गातील 12 वी फास्ट असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. तर या योजनेचे स्वरूप, योजनेच्या लाभासाठी पात्रता, शारीरिक क्षमता, अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे, अर्ज कसा करावा, सामाजिक प्रवर्गनिहाय विभागणी (Category Wise Reservation) प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. 

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेचे स्वरूप (mahajyoti police bharti training 2023)

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना महाजोती संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

प्रशिक्षणाचा कालावधी - 4 महिने करिता

विद्यावेतन - ₹6000 रु प्रति उमेदवार (ऑफलाइन प्रशिक्षणाकरिता)

प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या - नागपूर साठी - 300 ते छत्रपती संभाजीनगर साठी - 300 एकूण 600 उमेदवार
शिक्षण पात्रता (Education/ Qualification) - 12 वी पास

योजनेच्या लाभासाठी पात्रता (Eligibility) - 

1) विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी

2) विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती - भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी

3) विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी

4) विद्यार्थी हा बारावी पास असावा किंवा असावी

5) मुलं किंवा मुली दोघेही अर्ज करू शकतात.

शारीरिक क्षमता (Physical Ability)

विद्यार्थी प्रशिक्षणा करिता पात्र झाल्यास खालील बाबींची पूर्तता करण्यात यावी अन्यथा योजनेचा लाभ घेता येणार नाही.

उंची (पुरुष) - कमीत कमी 165 से.मी. 

उंची (महिला) - कमीत कमी 155 से.मी. 

छाती - कमीत कमी 79 से.मी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 84 सेमी) केवळ पुरुषांकरिता.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड

2) रहिवासी दाखला

3) जातीचा प्रमाणपत्र

4) वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र

5) 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

6) बँकेचा तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक)

अर्ज कसा करावा (Online Application Form Fillup Process)

1) अर्ज करण्यासाठी महाजोतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईट वरती जाऊन Notice Board या पर्यावर क्लिक करून पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

2) अर्जासोबत वरती देण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रे Self Attested करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून मग अपलोड करावे.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद