Showing posts with label योजना. Show all posts
Showing posts with label योजना. Show all posts

शेतकरी पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास पतीला मिळणार दोन लाख रुपये...

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना :

Gopinath munde shetkari apghat yojana

योजना : शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास वारसपतीला दोन लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा सानुग्रह योजनेत केली आहे.

    यामुळे अपघाती  कारणामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदार पती असो किंवा सज्ञान मुला-मुलींना शासनाकडून दोन लाख रुपये अनुदान दिले जाते.

कोणाकडे अर्ज कराल ?

      गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी मृत शेतकऱ्याच्या वारसदाराने घटनेपासून 30 दिवसाच्या आवश्यक त्या कागदा पत्रासह तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करावा.

  प्राप्त प्रस्तावावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक हित निर्णय घेतला जातो. कागदपत्रात कुठे त्रुटी  आढळल्यास त्या सादर करण्याचे अर्जदारास सांगितले जाते.

खुशखबर ! आणखीन पाच वर्ष मिळणार मोफत अन्नधान्य...

 पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना :

pmjky 2023

 केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय :

                     देशातील 80 कोटी गरिबांना दरमहा पाच किलो मोफत अन्नधान्य देणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला आणखीन पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाबद्दल माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.

                    कोरोनावेळी गरजूंना मोफत अन्नधान्य देण्यासाठी केंद्राने 2020 मध्ये पीएमजी जे के वाय योजना सुरू केली होती. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत मिळणाऱ्या पाच किलो अनुदानित अन्नधान्य व्यतिरिक्त प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पाच किलो मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे.


अवकाळी पावसामुळे नुकसानभरपाई असा करा अर्ज ...

 अवकाळी पावसामुळे नुकसान :

Avkali nukashan bharpai

अवकाळी : महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍यांनी पीक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल, तर नुकसानीच्या 72 तास म्हणजे तीन दिवसांच्या आत तक्रार करणे आवश्यक असते . अन्यथा भरपाई मधून वगळण्यात येते.

आँनलाईन तक्रार अशी करा :

1) प्लेस्टोअरवरून क्राँप इन्शुरन्स नावाचे अँप मोबाईल  मधे डाऊनलोड करा चार पर्याय पैकी तीन नंबरचा पर्याय निवडा "नोंदणी खात्याशिवाय खाते सुरु ठेवा " हा पर्याय निवडा. 

2) त्यानंतर पाच प्रकारचे पर्याय आपल्यासमोर येतील, त्यातील पीक आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे दोन पर्याय येतील, त्यातील पीक नुकसानीची पूर्व सूचना हा पर्याय निवडावा.

3) त्यानंतर मोबाईल क्रमांक भरून त्यावरील ओटीपी टाकून सबमिट करा. त्यानंतर हंगाम, वर्ष, योजना, राज्य अशी माहिती भरा.

4) नोंदणीचा स्रोत या रकान्यामध्ये विम्याचा फॉर्म कुठून भरला त्याची माहिती भरणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी क्रमांक भरा विम्याची संपूर्ण माहिती दिसेल त्यानंतर कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे ते निवडा.

5) आता फोनवरील लोकेशनचे ॲक्सेस अँपला  देऊन तपशील मध्ये घटनेचा प्रकार, दिनांक, वेळेस, पीक वाढीचा टप्पा, नुकसानीची संभाव्य टक्केवारी फोटो, व्हिडिओ अशी माहिती भरून "सादर करा "या बटणावर क्लिक करा त्यानंतर जो डॉकेट आयडी नंबर येईल तो जपून ठेवा. त्याचबरोबर नुकसानीची माहिती आपल्या गावातील तलाठ्याला  सुद्धा देणे आवश्यक आहे.


खुशखबर ! कांदा पिक अनुदान तिसरा हप्ता मंजूर लवकरच येणार खात्यावर...

कांदा पिक अनुदान तिसरा हप्ता  :

Kanda pik anudan 2023

 नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे आमच्या न्यू मराठी कॉर्नर चैनल वरती स्वागत आहे.

  सर्व शेतकरी बंधूंसाठी एक अत्यंत दिलासा अपडेट आहे. शेतकरी बंधूंनो जे आपण कांदा पिक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहात ती आता प्रतीक्षा संपलेले आहे. हो कारण कांदा पिक अनुदान तिसरा हप्ता मंजूर झालेला आहे.

  मित्रांनो त्याचाच जीआर काल 24 नोव्हेंबर 2023 रोजी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने आता सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावर उर्वरित तिसरा हप्ता सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा होणार आहे लवकरच.

        या अगोदर पहिल्या टप्प्यात दहा हजार आणि दुसऱ्या टप्प्यात दहा हजार अशाप्रकारे वीस हजार रुपये सर्व शेतकरी खात्यात जमा झाले होते. उर्वरित रक्कम आता तिसऱ्या हप्त्यात मंजूर करण्यात आलेले आहे. तरी सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावरती उर्वरित रक्कम जमा होणार आहे लवकरच.


खुशखबर ! नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता मिळणार पुढील महिन्यात ...

 नमो शेतकरी महासन्मान योजना 2023:

नमो शेतकरी महासन्मान योजना 2023 second installment
नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आम्ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत आणि एक सर्व शेतकरी वर्गांसाठी आनंदाची बातमी आहे.
तर शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेच्या धर्तीवर धरतीवर महाराष्ट्र सरकार ने सुरु केलेली नमो शेतकरी महा सन्मान योजना अंतर्गत पहिला हप्ता हा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्याच नुसार सुरू करण्यात आलेले नमो शेतकरी महासन्माननिधी योजना हा पहिला हप्ता जमा झालेला आहे. त्यानुसारच आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता

 पुढील महिन्यांमध्ये म्हणजेच डिसेंबर मध्ये पहिल्या आठवड्यात सर्व शेतकरी वर्गांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अजूनही नमो शेतकरी निधी योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी. तरच तुम्हाला हा दुसरा हप्ता मिळणार आहे.

pik vima status सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर यादीत आपले नाव पहा

सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर यादीत आपले नाव पहा :

Agrim pik vima 2023

महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना आता

केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.

याशिवाय सर्वसमावेशक पीक विमा योजना काय आहे, या योजनेत तुम्ही सहभागी कसे होऊ शकता, योजनेसाठीचे पात्रतेचे

निकष काय आहेत, जाणून घेऊया. pik vima status

याआधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 %, रबी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित

रकमेच्या 5 % एवढा हप्ता भरावा लागायचा. ही रक्कम, 700, 1000, 2000 पर्यंत प्रतिहेक्टरी जायची.

आता शेतकरी 1 रुपया भरुन योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. शेतकरी

हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे.

याशिवाय भाडेतत्त्वार शेती करणारे शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

खरिप हंगामातील भात (धान), खरिप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भूईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा

या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

तर रबी हंगामातील गहू, रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग, रबी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

तुम्ही स्वत: पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता.

शेतकरी मित्रांनो , सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी मुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून १२ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 27500 रुपये

मिळणार आहेत. या दहा जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टर 27500 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य

सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी. विभागीय आयुक्त, पुणे आणि सांभाजीनगर यांच्यामार्फत वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर.

खुशखबर ! शेतकरी बंंधुची दिवाळी होणार गोड... आजपासून पिक विमा रक्कम जमा होणार...

 अग्रीम पिक विमा 2023 :

Kharip Pik vima 2023

नमस्कार मित्रांनो सर्वान सर्व शेतकरी बंधूंसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कारण सर्व शेतकरी वर्गाची यावर्षीची दिवाळी गोड होणार आहे.

राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड होणार आहे विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पिक विमा आगरी वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.

यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी शेतकरी आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात कमी आहेत. बीड जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सात लाखावर असून कोल्हापुरात केव्हा 228 लाभार्थी आहेत.

एक रुपयात पिक विमा योजनेमध्ये राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. या इमारत कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यास आजपासून सुरुवात होणार आहे.

खुशखबर ! या तारखेला जमा होणार अग्रीम पिक विमा... शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार...

 अग्रीम पिक विमा मंजूर :

Agrim Pik vima 2023

25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी रुपये पिक विमा. 

विमा कंपन्यां अग्रीम पिक विमा देण्यास राजी झाल्या .पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 21 दिवसाचा खंड लागू झाल्यानंतर पावसाचा एकून नुकसानभरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25 टक्के अग्रीम पिक विमा देण्यासाठी विमा कंपन्यांनी मंजुरी दिली आहे. 

हे आहेत जिल्हे :

        नाशिक 

        जळगाव 

        नगर

        सोलापूर 

        सातारा 

        परभणी 

        नागपूर 

        कोल्हापूर 

        जालना 

        छत्रपती संभाजी नगर 

        सांगली

        बुलढाणा 

        नंदुरबार 

         धुळे

          पुणे 

          धाराशिव

  

निर्णय न झालेले जिल्हे :

        चंद्रपूर, नांदेड, लातूर ,हिंगोली 

वाशिम बाबत संभ्रम :

  


पीम किसान चा 15 वा हप्ता जमा होणार... शेतकर्‍यांची दिवाळी होणार गोड... कृआ हे काम तरच मिळेल हप्ता...

 पीम किसान योजना 15 वा हप्ता  :

pm kishan yojana 2023

नमस्कार सर्व शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत आम्ही तुमच्यासाठी.

तरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा जुलै महिन्यामध्ये 14 वा हप्ता   सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्याचप्रमाणे आता 15 वा  हप्ता सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार आहे. हो कारण पंधरावा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकरी बंधूच्या  खात्यावर जमा करण्यात येणार आहे ही एक आनंदाची आणि दिवाळी गोड करणारी माहिती आहे सर्व शेतकरी वर्गांसाठी आहे. 

या तारखेला जमा होणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता... Namo shetkari sanman nidhi yojna2023..

 नमो शेतकरी सन्मान योजना 2023 :


Namo shetkari sanman nidhi yojna2023

Pm किसान च्या  धर्तीवर राज्य सरकार ने जाहीर केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजना चा पहिला हप्ता 26 आक्टोबरला सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.  जे शेतकरी पीम किसान योजनेस पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजना साठी पात्र आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांनी kyc केली नाही त्यांनी लगेच करून। घ्यावी तरच आपल्याला हा हप्ता मिळणार आहे. 

25% पिक विमा अग्रीम दिवाळीच्या आत : कृषी मंत्री धनंजय मुंडे... pikvima agrim 2023

 पिक विमा -2023:

Pik vima agrim 2023

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा 25% अग्रीम दिवाळीच्या आठ जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी केले.

खुशखबर ! या तारखेला होणार अग्रीम पिक विमा सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर.... करा हे काम लवकर pikvima-2023...

 पिक विमा  - 2023 :

Pik vima-2023

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

ज्या शेतकरी बंधूंनी खरीप पिक विमा 2023 भरलेला आहे त्या सर्व शेतकरी बंधूंसाठी ग्रीन पिक विमा 2023, खरीप 2023 25% पीक विमा मंजूर झालेला आहे.

तरी सर्व शेतकरी वर्गाने आपल्या पिकाची माहिती ॲप डाऊनलोड करून त्यावरती आपली ही पिक पाहणी यावरती पिकाची नोंद करावी जे शेतकरी बंधू एक पाहणी वरती पिकाची नोंद करतील त्यांनाच हा अग्रीम पीक विमा 25 टक्के रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि एक महत्त्वाची माहिती अजून ही पिक पाहणी करण्याची तारीख ही वाढवले आहे ती 23 सप्टेंबर 2023 केली आहे तरी सर्व शेतकरी वर्गांनी 23 सप्टेंबर च्या आत मध्ये आपली पिकाची नोंदणी करून घ्यावी.

घरी बसल्या सातबारा उतारा वर वारस नोंदवा ...7/12 utara waras nond...

 वारस नोंदणी :

bhulekh.mahabhumi.gov.in-7/12

सातबारा उतारा : 

                     कुटुंबातील कर्तव्यक्तीचे निधन झाल्यावर वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. वारसाची नोंद ऑनलाईन अर्जाने देखील करता येणे शक्य झाले आहे. एक ऑगस्ट महसूल दिनापासून भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचे नियंत्रण नगर भूमापन कार्यालयाकडे आहे.

कसा कराल अर्ज : 

                        एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्याच्या आत वारस नोंदी साठी अर्ज करावा लागतो. शासनाच्या हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करता येतो.

असा करा अर्ज आँनलाईन : 

                        वारस नोंदीवण्यासाठी www.bhulekh.mahabhumi.gov.in हे संकेतस्थळ इंटरनेट वर शोधावे . या पेजवर खालच्या बाजूला सातबारा दोस्ती साठी ई हक्क प्रणाली अशी ही सूचना लिंक असते. पुढे pdeigr  या लिंक वर क्लिक केल्यावर पब्लिक डेटा एन्ट्री हे पेज ओपन होईल. यावरील लॉगिन पर्यायावर क्लिक केल्यावर अर्जदाराला स्वतःचे अकाउंट सुरू करावे लागेल त्यानंतर पुढे पूर्ण प्रक्रिया करता येते. 

कोणत्या सुविधा उपलब्ध :

                   महसूल दिनांक पासून ही सुविधा सुरू झाली आहे ही हक्क प्रणालीतून शेतकरी सात ते आठ प्रकारचे फेरफार अर्ज करू शकता.

 - सातबारावर बोजा चढविणे.

 - सातबारावर बोजा कमी करणे.

 - सातबारावर नाव दुरुस्त करणे.

 - सातबारावर वारसा हक्क नोंदणी करणे. इत्यादी आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.

तुम्हाला हे माहीत आहे का... 7/12 उतारा आणि 8अ चा उतारा या मधील फरक... पहा सर्व माहिती ...7/12 utara aani 8 अ चा utara...

 7/12 उतारा आणि  8 अ मधील फरक :

7/12 उतारा आणि  8 अ चा उतारा

7/12 उतारा :

                  सात बारा उतारावरून जमीनीचा मालक त्या जमीनीवरील कर्ज तसेच त्या जमीनी मधे कोणते पीक घेतले जातात या बाबत माहिती मिळते.तसेच आपल्या जमीनीतील विहीरीची नोंद तसेच बोरवेल ची नोंद असते. 


8 अ चा उतारा :

                     8 अ उतारा म्हणजे ज्या गावातील उतारा आहे त्या गावामधे एखाद्या व्यक्तीच्या नावे किती जमीन आहे याची माहिती असते. 

     एखाद्या व्यक्तीच्या नावे ऐकापेक्षा जास्त ठिकाणी जमीन नावे असते त्या जमीनीचे सर्व माहिती ऐका ठिकाणी आणि ऐकाच कागदावर असते. 

खुशखबर...! पिक विमा भरण्यासाठी तारीख वाढवली ...pmfby-2023...

 पिक विमा -2023 :

Pmfby-2023

खरीप पीक विमा भरण्यासाठी तारीख वाढवली आहे.तरी सर्व शेतकरी वर्गांना विनंती आहे की ज्यांचे पिक विमा अजूनही उतरावयाचा बाकी आहे.  त्यानी 3 आँगस्ट 2023 पर्यंत भरवून घ्यावा.  

 पिक विमा भरण्याची शेवटची तारीख 3 आँगस्ट 2023 आहे. 

महाराष्ट्रातील 1.43 कोटी शेतकर्यांनी भरला एक रूपयात पिक विमा... pmfby-2023...

 पिक विमा -2023 :

आज आहे शेवटचा दिवस 

pmfby-2023

  महाराष्ट्र : राज्य शासनाकडून पुढील तीन वर्षासाठी पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरता येतो. त्यानुसार राज्यात आतापर्यंत एक कोटी 43 लाख 27 हजार 515 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. 2022 च्या खरीप हंगामात 96 लाख 62 हजार 261 शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यंदा 43 लाख 65 हजार 254 शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.             

                  सर्वसमावेशक प्रधान मंत्री पीक विमा योजना राबविण्यात येण्याचा निर्णय 23 जून पासून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम राज्य शासनाकडून भरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रूपात पिक विमा भरता येत आहे. शिवाय विमा भरणाऱ्या सामायिक सेवा केंद्रांना ही कंपनी प्रति लाभार्थी चाळीस रुपये देते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया खर्च आला आहे.

              दरम्यान एक रुपयात पीक विमा करता येत असल्याने शेतकऱ्याने अर्ज केले आहेत. परिणामी विमा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दुप्पट वाढली आहे. राज्याच्या 81 हजार 182 कर्जदार शेतकरी आहेत. त्यांना विमा काढणे बंधनकारक आहे. तर एक कोटी 68 लाख 46 हजार 333 शेतकरी बिगर कर्जदार असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ही पिकांचा विमा उतरवलेला आहे.


खुशखबर !...आज मिळणार पी म किसान योजनेचे 2000 रूपये ... pm kisan yojana...

 Pm kisan yojana-2023 :

Pm kisan yojan 14th instalment

नमस्कार सर्व शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत.

    तर सर्व शेतकरी बंधू वाट पाहून आहेत की pm kisan योजनेचा 14 वा हप्ता केव्हा येणार तर  सर्वांना  सांगू इच्छितो की लवकरच म्हणजे या आठवड्याच्या शेवटच्या Pm kisan yojan 14th instalment सर्व शेतकरी बंधूच्या खात्यावर जमा होणार आहेत. 

खरीप पीक विमा अर्ज करण्यास सुरू ही आहे शेवटची तारीख... Kharip pikvima online application...

 खरीप पीक विमा-2023 :

Kharip Pik vima-2023
New Marathi Corner 
नमस्कार मित्रांनो आज आम्ही आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून सर्व शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वाची सूचना घेऊन आलो आहोत.
          तरी मित्रांनो सध्या खरी प हंगाम सुरू झालेला आहे तरी सर्व शेतकरी वर्गाची आपल्या शेतात पेरणी करण्याची लगबग सुरू असेल परंतु आपण जे पी येतात घेत आहोत यात संरक्षण आपण कशापासून करणार तर मित्रांनो त्यासाठी एकाच उपाय म्हणजे पिक विमा चला तर मित्रांनो आज आपण खरीप हंगाम 2023 यावर्षीचा पिक विमा भरण्याची सुरुवात केव्हा होणार आहे आणि शेवटची तारीख किती आहे अर्ज करण्याची ही आपण या माध्यमातून पाहूया.
         तर शेतकरी मित्रांनो खरीप पिक विमा २०२३ यावर्षीचा पिक विमा साठी अर्ज करण्याची सुरुवात एक जुलैपासून झालेली आहे आणि शेवटची तारीख की 31 जुलै असेल तरी सर्व शेतकरी बंधूंनी आपला लवकरात लवकर पिक विमा भरून घ्यावा तरी महाराष्ट्र सरकारने सर्व शेतकरी वर्गासाठी एक रुपयात आपण हा पिक विमा भरू शकतो तरी सर्व शेतकरी वर्गाने लवकरात लवकर आपला पिक विमा भरून घ्यावा.


कोरोनामुळे आई-वडिल गमावलेल्या मुलांना मिळणार 10 हजार रुपये... cororna kalat aai vadil gamablelya mulana milanar 10 hajar...

 कोरोनामुळे आई वडील गमावलेल्या मुलांना मिळणार 10 हजार रुपये :

Coronan death help-2023
New Marathi Corner 

                      कोरोनामुळे आई वा वडील अथवा दोघेही गमावलेल्या 3 ते 18 वयोगटातील बालकाला शैक्षणिक खर्चासाठी 10 हजार रुपयापर्यंत लाभ दिला जाणार आहे.

संबंधित बालकांनी महिला व बाल विकास अधिकारी किंवा शाळा मार्फत या कार्यालयाकडे 30 जून पर्यंत सादर करावे जिल्हा बाल विकास अधिकारी यांनी केले आहे धोरणामुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींच्या शैक्षणिक खर्चासाठी एक प्रयत्न 10000 निधी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 20 सप्टेंबर 2021 रोजी दिला होता.

काय लागतील कागदपत्रे :

                - कोरोनाने निधन झालेल्या पालकाचा मृत्यू                          दाखला

                - विद्यार्थ्याचा शाळेचा दाखला

                - आधार कार्ड 

                - बँक पासबुक

30 जुन 2023 पर्यंत  शेवट मुदत देण्यात आली आहे. 


कुठे कराल अर्ज : 

                       संबंधित बालकांनी महिला व बालविकास अधिकारी किंवा शाळामार्फत या कार्यालयाकडे 30 जून पर्यंत सादर करावे.

फक्त एक रूपयात काढा पिकविमा... kharip pikvima-2023...

 पिकविमा -2023 :

पिकविमा-2023
New Marathi Corner 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सर्व शेतकरी वर्गासाठी एक आनंदाचे आणि महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

राज्यशास्त्राची विभागाने शेतकऱ्यांसाठी एक रुपया भरून पिक विमा लागू करण्याचा अधिक जारी केला आहे पाच प्रकारच्या नुकसानाला या सर्व समावेशक पीक विमा योजनेत कवत मिळेल शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. 

कधी भरपाई ?  : 

 1)  प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न          झाल्यामुळे होणारे नुकसान.

2) अन्नपूर्णा प्रतिकूल हवामानामुळे झालेले नुकसान.

3) एक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक        आग विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर,              परिसर जलमय होणे, भूतखलन, दुष्काळ,                       पावसाळ्यातील खंड व रोग या बाबीमुळे उत्पन्न होणारी         घट.

4) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान.

5) नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात              नुकसान. 

योजना कोण राबवणार :

                  केंद्र सरकारने पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावाच्या विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2  टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के तसेच दोन्ही मधील नगदी पिकांसाठी आहे. राज्य सरकारच्या नवी पिक विमा योजनेत शेतकरी हिश्शयाचाभारदेखील राज्य सरकार उचलणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीची  जबाबदारी राज्य कृषी आयुक्तांची आहे.

                 उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना एक रुपयात पिक विमा योजना लागू करण्याची घोषणा केली होती. कृषी विभागाने या संदर्भात शुक्रवारी काढलेल्या आदेशामुळे त्या घोषणेची अमलबजावणी झाली आहे .

                दरम्याला राज्य सरकार या योजनेची प्रगतीचा  अहवाल सादर करणे त्यांना बंधनकारक असेल.


खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात तो दिला जाईल.