3 हेक्टर पर्यंत मदत जाहीर। येत्या अधिवेशनात घोषणा करण्यात येणार ...

 अवकाळी पाऊस आणि गारपीट :

Avkali paus

वार्ता : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र आधी सर्व जिल्ह्यांचे पंचनामे एकत्रित प्रस्ताव सादर झाल्यानंतरच मदत दिली जाणार आहे. मात्र प्रत्यक्ष मदतीची घोषणा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल. यासाठी महसूल कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रीतीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाला बैठकीत दिले.

नुकसानीचे पंचनामे तयार होण्यासाठी चार-पाच दिवस लागतील. त्यानंतरच नुकसानीची नेमकी आकडेवारी समोर येईल त्यानंतर मदतीचे सूत्र निश्चित केले जाईल. हे लक्षात घेता हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा शक्यता आहे.


तातडीने प्रस्ताव सरकारकडे पाठवा :

                      पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणा द्यावेत व ते 30 टक्के पेक्षा जास्त पिकांच्या नुकसानीची भरपाईचा प्रस्ताव रोजगार शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले.

मराठवाड्यात 60 हजार हेक्टर वर नुकसान :

           मराठवाड्यात 600158 हेक्टर वरील रब्बी हंगामातील पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे तर रविवार पासून बुधवार पहाटेपर्यंत 61.7 मिलिमीटर पाऊस विभागात झाला आहे बुधवारी सकाळपर्यंत विभागात 13 मि मी  पावसाची नोंद झाली.



No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद