महाराष्ट्रातील 1.43 कोटी शेतकर्यांनी भरला एक रूपयात पिक विमा... pmfby-2023...

 पिक विमा -2023 :

आज आहे शेवटचा दिवस 

pmfby-2023

  महाराष्ट्र : राज्य शासनाकडून पुढील तीन वर्षासाठी पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा भरता येतो. त्यानुसार राज्यात आतापर्यंत एक कोटी 43 लाख 27 हजार 515 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. 2022 च्या खरीप हंगामात 96 लाख 62 हजार 261 शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यंदा 43 लाख 65 हजार 254 शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.             

                  सर्वसमावेशक प्रधान मंत्री पीक विमा योजना राबविण्यात येण्याचा निर्णय 23 जून पासून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम राज्य शासनाकडून भरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रूपात पिक विमा भरता येत आहे. शिवाय विमा भरणाऱ्या सामायिक सेवा केंद्रांना ही कंपनी प्रति लाभार्थी चाळीस रुपये देते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया खर्च आला आहे.

              दरम्यान एक रुपयात पीक विमा करता येत असल्याने शेतकऱ्याने अर्ज केले आहेत. परिणामी विमा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दुप्पट वाढली आहे. राज्याच्या 81 हजार 182 कर्जदार शेतकरी आहेत. त्यांना विमा काढणे बंधनकारक आहे. तर एक कोटी 68 लाख 46 हजार 333 शेतकरी बिगर कर्जदार असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ही पिकांचा विमा उतरवलेला आहे.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद