Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ! फॉर्म भरताना लागणार ही 8 कागदपत्र... namo shetkari mahasamman yojana....

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
नमो शेतकरी महासन्मान योजना

 

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ! फॉर्म भरताना लागणार ही 8 कागदपत्र

 फॉर्म भरतेवेळी कोणकोणते आठ कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत . कोणते अटी लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आली आहे . तुम्हाला या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख संपूर्ण पहा.

मित्रांनो तुम्हाला माहीत असेल पीएम किसान योजना काय आहे दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये दिले जातात. आता त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. आणि पीएम किसान योजनेप्रमाणेच या योजनेत सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती तीन टप्प्यात 6000 रुपये जमा केली जाणार आहेत.  या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच फॉर्म भरणे सुरू होणार आहे . त्यामुळे तुमच्याजवळ आताच आठ कागदपत्रे तयार ठेवा तेव्हा आता आपण सर्वप्रथम कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत.  हे जाणून घेऊया आणि त्यानंतर पुढे काय प्रोसिजर करावी लागणार आहे.

ती सविस्तरपणे पाहूया तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पुरेशी डॉक्युमेंट देणे गरजेचे असते . आणि आपण तसं केलं नाही तर आपला फॉर्म पडताळणी मध्येच बाद केला जाऊ शकतो म्हणजेच रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून इथे सुद्धा असेच आहे या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळजवळ आठ प्रकारचे कागदपत्र सादर करावी लागणार आहेत .

आधार कार्ड link करण्यासाठी येथे click  करा

या योजनेसाठी फॉर्म भरतेवेळी हे आठ कागदपत्रे लागणार आहेत :

  1.   पासपोर्ट साईज दोन फोटो
  2.   आधार कार्ड
  3. रहिवासी पुरावा
  4.  उत्पन्नाचा दाखला
  5.  जात प्रमाणपत्र
  6.  सातबारा उतारा
  7.  रेशन कार्ड
  8.   बँक पासबुक तसेच स्वतःचा मोबाईल नंबर

मित्रांनो ही आठ कागदपत्रे फॉर्म भरतेवेळी तुमच्याजवळ असली पाहिजेत आणि मित्रांनो माझ्या माहितीनुसार ही सर्व आठ कागदपत्रे शेतकऱ्यांकडे सहज उपलब्ध असतात

अटी व पात्रता :

  •  नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी करणार्‍या शेतकरी हा मूळचा महाराष्ट्रातीलच रहिवासी असावा
  • अर्जदार शेतकऱ्याची थोडीफार तरी शेती असली पाहिजे
  •  बँक खात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहे
  •  आधार कार्डला तुमचा स्वतःचा किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद