साडे तीन क्विंटल कांदा विकला... हातात आले ते फक्त विना पैश्याची पट्टी... sade tin kinwtal kanda vikun hatat kahich ale nhi

 कांद्याला मिळाला कवडी मोल भाव:तिकीटाला ही उरले नाही पैसै। 

कांदा भाव
कांद्याने रडवले

बीड: बाजारात भाव पडल्याने कांद्याने उत्पादक शेतकरी आणि कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणले आहे साडेतीन टन कांदा विक्री करू नये पदरात काहीच पडले नाही उलट अडत व्यापाऱ्याला 1800 रुपये देण्याची वेळ बीड तालुक्यातील जयतालवाडी येथील भागवत सोपान डांगे या शेतकरी कुटुंबावर आली.

      70 हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने हातात झालेल्या शेतकऱ्याने आम्ही जगायचे कसे मुलाचे शिक्षण करायचे कसे असा प्रश्न व्यवस्थेला केला आहे.

        जैताळवाडी येथील भागवत डांगे यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली महागाचे बियाणे लागवडीचा खर्च खुरपणी फवारणी खते आणि कापणीचा खर्च असा 70 हजार रुपये खर्च केला १२० गुन्ह्यात भरून कांदा सोलापूरच्या बाजारात पाठवला कांदा विक्री केल्यानंतर हाती पडलेली पट्टी पाहून आणि आणखी 832 रुपये जमा करण्याचे अडत्या अडत्याने सांगितल्याने भागवत डांगे व मुलाला धक्काच बसला गावाकडून पैसे मागून घेतले तिकिटासाठी शंभर रुपये देखील उरले नव्हते रिकाम हाताने आलेल्या भागवत रावांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कुटुंबई रात्रभर रडले जगायचे तसे असा प्रश्न या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या कुटुंबाने केला.

असा आहे हिशोब :

             कांद्याला मिळाला 50 रुपये क्विंटल भाव

1) भागवत डांगे यांना पंधराशे 50 किलो कांद्याचे 775 रुपये आले बाजारात हमाली तोला यांनी तर खर्च 288 रुपये झाला त्यांना मायनस पट्टी मिळाली मिळाली शेतकऱ्याला पदरशेत 1383 रुपये द्यावे लागले.

           कांद्याला मिळाला शंभर रुपये क्विंटल भाव

2) डांगे यांनी 2011 किलो कांदा विकला असता शंभर रुपये क्विंटल भाव मिळाला फक्त 2135.20 रुपये पट्टी आली त्या कडील हमाली तो लय आणि इतर खर्च 2583.89 आला 448.69 रुपये शेतकऱ्याला पदरचे भरावे लागले.

     हातात काहीच आले नाही:

       कांदा चांगला निघाल्याने किमान दीड लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती यातून मुलाचे शिक्षण लग्न घर प्रपंच चालवता येईल असे वाटले होते पण काहीच हाती लागले नाही. 

                             : भागवत डांगे, 

                                    शेतकरी जैताळवाडी. 

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद