New Marathi Corner |
कोणत्या अपघातांसाठी मदत मिळते ? :
• रस्ता /रेल्वे अपघात
•पाण्यात बुडून मृत्यू सर्पदंश / विंचूदंशातूनविषबाधा
• जनावरांचा हल्ला वा चाव्याने मृत्यू •उंचावरून पडून मृत्यू
•वीज पडून व इलेक्ट्रिक शॉकने मृत्यू
किती रूपये मदत मिळते :
• शेती करताना अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास तसेच अपघातामुळे दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय आणि निकामी झाल्यास दोन लाख रुपये मिळतात.
• एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अनुदान दिले जाते.
कोणती कागदपत्र लागतात ? :
• क्लेम फॉर्म भाग-१ व सहपत्र
• क्लेम फाॅर्म भाग-२ ( अ ) व ( ब )
• क्लेम फाॅर्म भाग-३
• सातबारा उतारा ६-क (वारस नोंद उतारा) ६-ड फेरफार उतारा
• वयाचा पुरावा
• बँक पासबुक
• शिधापत्रिका
• मृत्यू दाखला
• अपंगत्व दाखला
• अपंगत्वाचे टक्केवारीचे प्रमाणपत्र व फोटो
• प्रथम माहिती अहवाल (एफ आय आर)
• घटनास्थळ पंचनामा
• पोलिस पाटील माहिती अहवाल
• शवविच्छेदन अहवाल
• व्हिसेरा अहवाल
• नावात / आडनावात बदल असल्यास प्रतिज्ञापत्र
सातबारावर नाव नसल्यास :
या योजनेमध्ये सातबारावर नाव असलेल्या संबंधित व्यक्तीलाच नव्हे तर सातबारावर नाव नसलेल्या कुटुंबातील इतर सदस्याचा अपघात मृत्यू झाला किंवा अपंगत्व आल्यास वरील प्रमाणे लाभ देण्यात येतो. त्यामुळे 2018-19 पासून या योजनेअंतर्गत संपूर्ण कुटुंबाला संरक्षित देण्यात आले आहे.
कुठे करायचा अर्ज :
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत प्रत्येक तालुका कृषी कार्यालयामध्ये हा फॉर्म सर्व कागदपत्रासह जमा करावा.
No comments:
Post a Comment
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद