गाई, म्हशी गोठा अनुदान योजना - २०२३...करा असा अर्ज...sharad pawar gramsamrudhi yojna-२०२३...

 

गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे :

गाई व म्हशींसाठी निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसते. त्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नसते, याच कारणामुळे शेतकऱ्याला जनावरे ओबडधोबड ठिकाणी बांधावे लागतात. अश्या ठिकाणी गुरे बांधल्यामुळे आरोग्याची काळज़ी नीट होत नाही. त्यामुळे जनावरांना विविध आजार होतात.
यासोबतच शेतकऱ्याला गुरांचे शेण यांची साठवणूक हि नीट करता येत नाही. यामुळेच या योजनेअंतर्गत गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान देऊन महाराष्ट्र शासनाने अर्थसाहाय्य केले आहे. एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च होईल. २ गुरे ते ६ गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर त्यापेक्षा अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान शासन देणार आहे.

शरद पवार ग्रामसर्मधी योजना २०२३
New Marathi Corner 

काय आहे योजना : ग्रामीण भागातील शेतकरी वर्गांना आर्थिक मदत म्हणून गाई, म्हशी यासाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत ही शेतकऱ्याला दिली जाते.
               या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या जनावरांसाठी संरक्षण करण्यासाठी पाऊस यापासून बचाव करण्यासाठी आपल्या जनावरांना गोठा बांधण्यासाठी राज्य सरकार हे ७७ हजार १८८ रुपये अनुदान म्हणून शेतकऱ्याला देणार आहे.


शरद पवार ग्रामसमृद्धी योजना लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता –

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत
  • लाभार्थी कोणत्याही संघटनेचा भाग असू नये कारण हि योजना राज्यातील बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी  आहे.
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र आवश्यक

कुठे कराल अर्ज : 
                      आपण आपल्या गावातील सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे हा अर्ज विहित नमुन्यात व सर्व कागदपत्रासह आपण आपल्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे करू शकतो. 


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद