शेतकरी पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास पतीला मिळणार दोन लाख रुपये...

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना :

Gopinath munde shetkari apghat yojana

योजना : शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास वारसपतीला दोन लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा सानुग्रह योजनेत केली आहे.

    यामुळे अपघाती  कारणामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदार पती असो किंवा सज्ञान मुला-मुलींना शासनाकडून दोन लाख रुपये अनुदान दिले जाते.

कोणाकडे अर्ज कराल ?

      गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी मृत शेतकऱ्याच्या वारसदाराने घटनेपासून 30 दिवसाच्या आवश्यक त्या कागदा पत्रासह तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करावा.

  प्राप्त प्रस्तावावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक हित निर्णय घेतला जातो. कागदपत्रात कुठे त्रुटी  आढळल्यास त्या सादर करण्याचे अर्जदारास सांगितले जाते.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद