अवकाळी पावसामुळे नुकसानभरपाई असा करा अर्ज ...

 अवकाळी पावसामुळे नुकसान :

Avkali nukashan bharpai

अवकाळी : महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍यांनी पीक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल, तर नुकसानीच्या 72 तास म्हणजे तीन दिवसांच्या आत तक्रार करणे आवश्यक असते . अन्यथा भरपाई मधून वगळण्यात येते.

आँनलाईन तक्रार अशी करा :

1) प्लेस्टोअरवरून क्राँप इन्शुरन्स नावाचे अँप मोबाईल  मधे डाऊनलोड करा चार पर्याय पैकी तीन नंबरचा पर्याय निवडा "नोंदणी खात्याशिवाय खाते सुरु ठेवा " हा पर्याय निवडा. 

2) त्यानंतर पाच प्रकारचे पर्याय आपल्यासमोर येतील, त्यातील पीक आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे दोन पर्याय येतील, त्यातील पीक नुकसानीची पूर्व सूचना हा पर्याय निवडावा.

3) त्यानंतर मोबाईल क्रमांक भरून त्यावरील ओटीपी टाकून सबमिट करा. त्यानंतर हंगाम, वर्ष, योजना, राज्य अशी माहिती भरा.

4) नोंदणीचा स्रोत या रकान्यामध्ये विम्याचा फॉर्म कुठून भरला त्याची माहिती भरणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी क्रमांक भरा विम्याची संपूर्ण माहिती दिसेल त्यानंतर कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे ते निवडा.

5) आता फोनवरील लोकेशनचे ॲक्सेस अँपला  देऊन तपशील मध्ये घटनेचा प्रकार, दिनांक, वेळेस, पीक वाढीचा टप्पा, नुकसानीची संभाव्य टक्केवारी फोटो, व्हिडिओ अशी माहिती भरून "सादर करा "या बटणावर क्लिक करा त्यानंतर जो डॉकेट आयडी नंबर येईल तो जपून ठेवा. त्याचबरोबर नुकसानीची माहिती आपल्या गावातील तलाठ्याला  सुद्धा देणे आवश्यक आहे.


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद