घरी बसल्या सातबारा उतारा वर वारस नोंदवा ...7/12 utara waras nond...

 वारस नोंदणी :

bhulekh.mahabhumi.gov.in-7/12

सातबारा उतारा : 

                     कुटुंबातील कर्तव्यक्तीचे निधन झाल्यावर वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. वारसाची नोंद ऑनलाईन अर्जाने देखील करता येणे शक्य झाले आहे. एक ऑगस्ट महसूल दिनापासून भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचे नियंत्रण नगर भूमापन कार्यालयाकडे आहे.

कसा कराल अर्ज : 

                        एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्याच्या आत वारस नोंदी साठी अर्ज करावा लागतो. शासनाच्या हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करता येतो.

असा करा अर्ज आँनलाईन : 

                        वारस नोंदीवण्यासाठी www.bhulekh.mahabhumi.gov.in हे संकेतस्थळ इंटरनेट वर शोधावे . या पेजवर खालच्या बाजूला सातबारा दोस्ती साठी ई हक्क प्रणाली अशी ही सूचना लिंक असते. पुढे pdeigr  या लिंक वर क्लिक केल्यावर पब्लिक डेटा एन्ट्री हे पेज ओपन होईल. यावरील लॉगिन पर्यायावर क्लिक केल्यावर अर्जदाराला स्वतःचे अकाउंट सुरू करावे लागेल त्यानंतर पुढे पूर्ण प्रक्रिया करता येते. 

कोणत्या सुविधा उपलब्ध :

                   महसूल दिनांक पासून ही सुविधा सुरू झाली आहे ही हक्क प्रणालीतून शेतकरी सात ते आठ प्रकारचे फेरफार अर्ज करू शकता.

 - सातबारावर बोजा चढविणे.

 - सातबारावर बोजा कमी करणे.

 - सातबारावर नाव दुरुस्त करणे.

 - सातबारावर वारसा हक्क नोंदणी करणे. इत्यादी आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद