शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी !...सौर कृषी वाहीनीचा दुसरा टप्पा... krushi pump yojna...

 कृषीवार्ता :

Krushipump yojna-2023
New Marathi Corner 

                 नमस्कार मित्रांनो आज आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो आज झालेल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
                 शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री कृषी वाहीनी योजना चा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.
               सन 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर विजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
               याचा लाभ राज्यातील 45 लाख कृषी विजग्राहकांना होईल. 
              सन 2023-24 आणि सन 2028-29 कालावधीसाठी एकूण 700 कोटी रुपयांचा निधीस आणि सन 2023-24 साठी 25 कोटी  रुपये इतका निधी हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. 


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद