कांदा अनुदान ! ... असा करा अर्ज ? ...ही आहे शेवटची तारीख अर्ज करायची... kanda anudan 2023...

 कांदा अनुदान -2023 :

कांदा अनुदान 2023
New Marathi Corner 

कांदा अनुदान : 
                   बाजारात कांद्याचे भाव गडगडलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चही निघत नाही. काही जिल्ह्यात तर शेतकऱ्यांना बाजारात कांदा विक्री केल्यानंतर पदरमोड करून अडत्याची फी भरावी लागली होती .या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तीनशे रुपये अनुदान जाहीर केले होते हे अनुदान मिळवण्यासाठी शासनाने 20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले होते त्यानंतर ही अनुदान 300 रुपये वाढवून ते साडेतीनशे रुपये करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शक्य इतक्या लवकर अर्ज केला तरच अनुदान मिळू शकते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 
                        कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता आल्या नसल्याची ओरड झाल्यानंतर शासनाने आता पात्र शेतकऱ्यांना 20 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी वीस तारखेच्या आत मध्ये फॉर्म भरून घेण्यात यावेत अन्यथा कोणत्याही शेतकऱ्याला मदत मिळणार नाही.

अनुदान मर्यादा  : 
                       कांद्याचे भरघोस उत्पन्न होते यामुळे नाशिक सारख्या जिल्ह्यात शेतकरी त्यांनी हंगामात कांदा पिकाची लागवड करतात कांद्याची शेती अन्य पिकांसारखे बेभरवशाचे  आहे. याशिवाय कांद्याचे दर कधी वाढतील आणि कधी उतरतील हे सांगता येत नाही. सध्या गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर शोधत बसलेले आहेत या पार्श्वभूमीवर शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे क्विंटल च्या मर्यादितेत पण प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
किती मिळणार अनुदान : 
                             अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शिवाय कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रत्येक क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
 
कुठे कराल अर्ज : 
 - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना पणन महासंघाकडून राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 - यामुळे आवश्यक त्या कागदपत्रासह शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
कोणती कागदपत्र लागतील :
                  • आधार कार्ड 
                  • बँक पासबुक 
                  • कांदा विक्री पावती
                   


- New Marathi Corner 


No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद