गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना :
योजना : शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास वारसपतीला दोन लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा सानुग्रह योजनेत केली आहे.
यामुळे अपघाती कारणामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदार पती असो किंवा सज्ञान मुला-मुलींना शासनाकडून दोन लाख रुपये अनुदान दिले जाते.
कोणाकडे अर्ज कराल ?
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी मृत शेतकऱ्याच्या वारसदाराने घटनेपासून 30 दिवसाच्या आवश्यक त्या कागदा पत्रासह तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करावा.
प्राप्त प्रस्तावावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक हित निर्णय घेतला जातो. कागदपत्रात कुठे त्रुटी आढळल्यास त्या सादर करण्याचे अर्जदारास सांगितले जाते.




