चिऊताई... चिमण्यांची प्रजाती लोप पावत चाली आहे... Chimnyachi prajati lop pavat ahe...

जागतिक चिमणी दिन !


जागतिक चिमणी दिन
जागतिक चिमणी दिन 

विशेष :जागतिक चिमणी दिन! बेघर झालेल्या चिऊताईला आसरा देऊ

आज २० मार्च, अर्थात जागतिक चिमणी दिन. मानवी वस्तीजवळ राहणाऱ्या चिमण्यांची संख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने घटू लागली आहे. त्याबद्दल जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. अगदी लहान असल्यापासून माणसाला ज्या प्राणी-पक्ष्यांची ओळख करून दिली जाते, त्यात चिऊताईचा क्रमांक सगळ्यात वरचा असतो. चिमणीचे माणसाशी असलेले नाते जवळपास १० हजार वर्षे जुने आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अशी ही आपल्या अंगणात नाचणारी, घरांच्या अवतीभवती उडणारी अन् चिवचिवाट करणारी चिऊताई आज बेघर झाली आहे. गोष्टीतील चिमणीचे घर मेणाचे असल्याने ते वाहून जात नाही आणि चिमणी बेघर होत नाही; पण आज प्रत्यक्षात मात्र चिमण्या बेघर होऊ लागल्या आहेत आणि त्यांची संख्याही झपाट्याने कमी होऊ लागली आहे. वेगाने होणारे शहरीकरण हे त्याचे मुख्य कारण असून, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी २०१० पासून दर वर्षी २० मार्च रोजी वर्ल्ड स्पॅरो डे अर्थात जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो. याबद्दल जागृतीसाठी दिल्लीने २०१२ मध्ये चिमणीला राज्यपक्षी म्हणून घोषित केले आहे. काही भागांत जागृती वाढल्यामुळे त्यांच्या पक्ष्यांसाठी, तसेच खास करून चिमण्यांसाठीही अन्न-पाण्याची व्यवस्था केली जात आहे.सिमेंटची जंगले, मोबाइल टॉवर, वाहनांची गर्दी, त्यामुळे होणारे प्रदूषण अशा कारणांमुळे पक्ष्यांची आणि विशेषतः चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. कारण या चिमण्या मानवी वस्तीतच वास्तव्याला असतात. या चिमण्यांना इंग्रजीत हाउस स्पॅरो असे म्हणतात, तर Passer domasticus हे त्यांचे शास्त्रीय नाव आहे. पॅसर म्हणजे झाडांच्या फांद्यांवर बसून गाणारा छोटा पक्षी. डोमेस्टिकस म्हणजे पाळीव, घरगुती, घरोब्याचे! यावरूनच त्यांचे माणसाशी असलेले संबंध स्पष्ट होतात.  चिमण्यांची संख्या घटल्याने ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे..’ अशी साद घालायची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले, तर त्यांची घटलेली संख्या नक्की वाढेल, असे शास्त्रज्ञांना वाटते. मानवी वस्तीमध्ये शक्य तेथे वृक्षारोपण, तसेच कृत्रिम घरटी आणि मातीच्या भांड्यात पाण्याची व्यवस्था, घराच्या अंगणात व गच्चीवर दररोज पसाभर धान्य पसरवून टाकणे, अशा उपाययोजना केल्या, तर चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा अनुभवायला मिळू शकेल.

                      न्यू मराठी कॉर्नर

घट कशामुळे झाली ?

         • शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान                        सिमेंटची घरामुळे चिमण्यांचा रहिवास धोक्यात।              आला आहे.

         • कमी होत चाललेली दंगले आणि शहरात।                      निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स आणि तारांची                जंगले.

         • पिकावर होणाऱ्या हानीकारक                                        कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा।                      झालेल्या चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण                  वाढले आहे.

         • विणीच्या हंगामात प्रजनन प्रजनन काळात                     चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा               होणारा त्रास.

          संवर्धनाची गरज आहे.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद