कुसूम- ब सोलार पंपाचे अर्ज सुरू... kusum-b solar pump online form...

 कुसुम सोलार पंप अर्ज सुरू  :

kusum solar pump 2023
kusum solar pump 2023

महाऊर्जा’मार्फत (Maha Urja) शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी १७ मेपासून कुसुम योजनेचे (Kusum-B Yojana) ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे.

तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्धीनुसार पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जा विभागीय कार्यालय, नाशिकचे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.

१३ जानेवारी २०२१ रोजी १ लाख सौर कृषिपंप व ३० ऑगस्ट २०२२ रोजी पुढील १ लाख सौर कृषिपंप असे एकूण दोन लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली.

राज्य शासनाकडून १२ मे २०२१ रोजी राज्यात या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी एक लाख नग या प्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये ५ लाख कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले.

या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे.

फसव्या संकेतस्थळाचा वापर टाळावा
महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार असून, योजनेची व ऑनलाइन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट, फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये. महाऊर्जामार्फत सुरू केलेल्या ऑनलाइन पोर्टलचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा.

तसेच ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी ०२०-३५०००४५६ /०२०-३५०००४५७ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असेही विभागीय महाव्यवस्थापक कुलकर्णी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद